महिलेच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

crime
crime

परभणी : महिलेच्या त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना परभणीत घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी होत असल्याने आत्महत्या करत असल्याचा युवकाने चिठ्ठीतून आरोप केला आहे. सचिन मिटकरी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

या युवकावर महिलेने ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्कार केल्याचा गुन्हा पाच ते सहा दिवसांपूर्वी दाखल केला होता. रविवारी रात्री परभणी-वसमत रस्त्यावर असलेल्या ब्रम्हा अपार्टमेंटमध्ये युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोंढा पोलिस तपास करत असून महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com