झोन कार्यालये तीन दिवस रात्री 12 पर्यंत खुली राहणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

औरंगाबाद - मालमत्ता कर वसुलीसाठी बुधवार (ता.29) पासून पुढील तीन दिवस सर्व झोन कार्यालये रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना कर भरणा करण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे महापालिका आयुक्‍त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले. 

मार्चअखेरसाठी महापालिका प्रशासनाच्या हातात अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. 2016-16 या आर्थिक वर्षात मालमत्ता करवसुलीचे 290 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. ते डिसेंबर अखेरपर्यंत 57 कोटी 90 लाख इतकेच झाल्याने सुधारित अर्थसंकल्पात प्रशासनाने उद्दिष्ट कमी करून ते 290 कोटी वरून 100 कोटींपर्यंत आणले होते. हे उद्दिष्ट गाठतानाही प्रशासनाची सध्या दमछाक सुरू आहे. पाणीपट्टीच्या माध्यमातून 51 कोटी 72 लाख रुपयांचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले होते. हे सुधारित अर्थसंकल्पात कमी करून 43 कोटी 23 लाख करण्यात आले आहे. समांतर पाणीपुरवठा योजनेकडे पाणीपुरवठा हस्तांतरित करताना ग्राहकांचा सर्व डाटा कंपनीकडे देण्यात आला होता, तो अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झाला नसल्याने पाणीपट्टी वसुलीसाठी अडचण येत आहे. दरम्यान, आता पाणीपट्टी, मालमत्ता कर वसुलीसाठी प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. मार्चअखेरमुळे नगारिकांकडूनही कराचा भरणा करण्यात येत आहे. नागरिकांची सोय व्हावी यासाठी प्रशासनाने बुधवार (ता.29) ते शुक्रवार (ता.31) दरम्यान नऊ झोन कार्यालये रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: Zone offices will be open until 12 at night for three days