जिल्हा परिषदेत तरुणाईचा बोलबाला

जिल्हा परिषदेत तरुणाईचा बोलबाला

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेमध्ये तरुण सदस्यांची फौज दाखल झाली आहे. त्यांचे कामकाज उत्सुकतेचा विषय असणार आहे. यातील बहुतांश नेत्यांचे वारसदार असल्याने त्यांना जिल्हा परिषदेत प्रभाव दाखवावा लागणार आहे. 

जिल्ह्यातील ५५ सदस्यांमध्ये यंदाच्या निवडणुकीत तरुणवर्गाला मोठ्या प्रमाणात संधी होती. यामध्ये बहुतांश तरुण कार्यकर्त्यांना विजयश्री मिळाली आहे. आमदार बसवराज पाटील यांचे चिरंजीव शरण पाटील यांना आलूरमधून संधी मिळाली. पहिल्यांदाच त्यांची जिल्हा परिषदेमध्ये एंट्री होत आहे. आमदार पाटील यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांचे जिल्हा परिषदेतील कामकाज चालणार आहे. 

भाजपचे कैलास शिंदे यांचे चिरंजीव दिग्विजय शिंदे यांनीही गुंजोटी गटातून विजय मिळविला आहे. तरुणाईला संधी देण्याचे सर्वच पक्षांकडून आश्‍वासन दिले जाते. परंतु प्रत्यक्षात अनुभव हा निकष लावत उमेदवारी देण्याचा प्रयत्न होतो.
 परंतु, राजकीय वारसा पुढे सुरू ठेवण्याच्या हेतूने तसेच घरातील वरिष्ठांकडून मिळालेल्या प्रेरणेतून राजकीय आखाड्यात उड्या मारल्या जातात. सांजा गटातून कैलास पाटील यांनी बाजी मारली आहे. गेल्या पाच वर्षात सारोळा व परिसरात श्री. पाटील यांनी मोठ्या प्रमाणात जलसंधारणासह शेतीची कामे केली आहेत. दुष्काळातही एक आदर्श गाव म्हणून राज्यात सारोळ्याची ओळख निर्माण केली आहे. तेही पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत जात आहेत. 

भाजपचे अभय चालुक्‍यांनीही तुरोरी गटातून बाजी मारली आहे. या तरुण सदस्यांच्या डोईवर जनतेच्या अपेक्षांचे ओझे असणार आहे. घरात राजकीय पार्श्वभूमी असल्याने वरिष्ठांच्या अनुभवाचा जनतेच्या हितासाठी फायदा होणार आहे. काम केले तरच जनता स्वीकारते, याची जाणीव सर्वांना आहे. जनताही तरुण सदस्यांकडे अपेक्षेने पाहत असून ही फौज कसे कामकाज करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 

सक्षणा सलगर अभियंता
सक्षणा सलगर यांनी पाडोळी गटातून बाजी मारली आहे. युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या मराठवाडा संघटक आहेत. घरात कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना त्यांनी राजकीय क्षेत्रात यश मिळविले आहे. सक्षणा यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सामान्य कुटुंबातील युवक, युवतींना राजकारणात संधी देण्याची राष्ट्रवादीची परंपरा सलगर यांच्या माध्यमातून दिसत आहे. त्या सोशल िमडियावरही सक्रिय आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com