सौभाग्यवतीच्या उमेदवारीसाठी दिग्गजांकडून फिल्डिंग

सौभाग्यवतीच्या उमेदवारीसाठी दिग्गजांकडून फिल्डिंग

कळंब - राजकीयदृष्ट्या महत्वाचा समजला जाणारा जिल्हा परिषदेचा डिकसळ गट मागासप्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाला आहे. या गटातून नेतृत्व करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी आपल्या सौभाग्यवतीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. मागील निवडणुकीत हा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होता. जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपकडे उमेदवारांची वाणवा असल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या निवडणुकीवेळी काँग्रेस-शिवसेनेने आघाडी करून डिकसळ गटावर वर्चस्व स्थापन केले होते. शिवसेनेचे माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर याचे खंदे समर्थक तसेच डिकसळ गटाचे नेतृत्व करणारे पांडुरंग कुंभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांचे डिकसळ गट, गणांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर श्री. कुंभार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हिरवा कंदील दिल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेला आक्रमक तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार शोधण्यास कस लागणार आहे. तालुक्‍यातील सर्वच गटांत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप असा चौरंगी सामना रंगणार आहे. 

डिकसळ गटातील दोन्ही गण महिलांसाठी राखीव आहेत. २००७ मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (कै.) भारत खोसे विजयी झाले होते. तर त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेनेने आघाडी केली होती. काँग्रेसच्या अर्चना शेळके त्यावेळी विजयी झाल्या.

डिकसळ गटात यंदा रचनेत बदल झाला असून, नव्याने लोहटा (पूर्व) गणाचा समावेश झाला आहे.

 डिकसळ गणात खडकी, लोहटा (पश्‍चिम) तर लोहटा (पूर्व) गणात करंजकल्ला, कोथळा, हिंगणगाव, दाभा, अवाडशिरपुरा या गावांचा समावेश आहे. गटाच्या रचनेमुळे राष्ट्रवादीला पोषक असणाऱ्या गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे या गटात राष्ट्रवादीने तगडा उमेदवार देऊन काँग्रेस, शिवसेना, भाजपला आव्हान देणार असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेसाठी विमल धाकतोडे डिकसळ गणातून लीलावती दत्तात्रेय कदम, अंजली भाऊसाहेब नवले, रंजना महादेव खोसे, अंजली रविकांत पवार, लोहटा (पूर्व) गणांतून तनुजा बाळासाहेब टोपे, सविता सिद्धेश्‍वर शिंदे, अंजली हनुमंत ढगे, इंदूबाई ओव्हाळ, भाजपकडून डिकसळ गणासाठी दीपाली पौळ, शेख रेहाना मुर्तुजा, शिवसेनेकडून गटासाठी मीना हरिचंद्र तोडकर, शिवकन्या संतोष कसपटे, गणातून रुक्‍मिणीबाई आंबिरकर, रत्नमाला काळे, रजनी बोराडे, शाश्‍वती खोसे, पूनम राखुंडे, सिंधू आंबिरकर, लोहटा (पूर्व) गणातून वैशाली वाघमारे, शीला लोंढे हे इच्छुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com