जिल्हा परिषद शाळेस इंग्रजीचा शिक्षक मिळेना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

तळेगाव - केंद्रांतर्गत येणाऱ्या पिंपळगाव कोलते येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेला दहा वर्षांपासून इंग्रजी विषयाचा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

तळेगाव - केंद्रांतर्गत येणाऱ्या पिंपळगाव कोलते येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेला दहा वर्षांपासून इंग्रजी विषयाचा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव कोलते येथील शाळेत इंग्रजी विषयाच्या शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांनी व पालकांनी वारंवार जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. मात्र, शिक्षक नियुक्‍त केलेला नाही. नववी तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी अभ्यासक्रमापासून वंचित राहावे लागत आहे. गावातील पन्नास ते साठ विद्यार्थ्यांना तळेगाव येथील खासगी हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी पाच ते सहा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने पिंपळगाव कोलते येथे इंग्रजी विषयाचा पूर्णवेळ शिक्षक दिल्यास विद्यार्थ्यांची पायपीट थांबून अभ्यासात प्रगती होईल. शिक्षण विभागाने शाळा सुरू होईपर्यंत येथे शिक्षक नियुक्‍त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामसिंग सोळुंके यांच्यासह पालकांनी दिला आहे.

ग्रामस्थांनी स्वखर्चाने बांधली शाळा
भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव कोलते येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वखर्चातून शाळेची इमारत बांधलेली आहे. येथे पहिली ते दहावीपर्यंत शैक्षणिक वर्ग आहेत.

Web Title: zp school english subject teacher