घर गार...पर्यावरणाला चटके

जितेंद्र चांदोरकर
सोमवार, 24 एप्रिल 2017

आपले पाणी वापरायचे. त्यात कीटकनाशक असल्याची तक्रार करायची आणि दोन-तीन रूपये निर्मिती खर्च असलेली कोल्ड्रिंक्स भरपूर नफ्याने विकायची. जाहिराती करायला सुपरस्टार्स आहेतच. लोक अभिमानाने खातात-पितात; मग तब्बेतीची वाट का लागेना ! अमीर खान आणि त्याची बायको पाण्यासाठी मोहीम राबवत आहेत. आधी या लोकांनी कोल्ड्रिंक्स, पिझ्झा, बर्गर इत्यादींच्या जाहिराती करू नयेत. तरच त्यांच्या प्रयत्नांना अर्थ आहे. नाहीतर उरतो तो प्रसिद्धीचा स्टंट. 

तत्कालिन केंद्रीय अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी 1992 पासून जागतिक आणि उदारीकरणाचा स्विकार केला आणि भारताची दारे मल्टिनॅशनल कंपन्यासाठी खुली केली. या कंपन्यांचा भारतात चंचूप्रवेश झाला अगदी ईस्ट इंडिया कंपनीसारखा. ईस्ट इंडिया कंपनीने भारत गिळंकृत केला हळूहळू. भारतीयांमध्ये फुट पडून. अगदी तसेच या नफेखोर लोभी, पर्यावरण शत्रू कंपन्यांनी सुरु केले आहे. 

प्रथम मायक्रोचिप्स दिल्या; ज्या आपल्याला हव्या होत्या. मग पाठोपाठ बटाटा, चिप्स पिझ्झा, बर्गर, मिनरल वॉटल इत्यादी वस्तू-पदार्थ भारतात बनू लागले. त्यामुळे भारतीयांना काम मिळाले. राहणीमान वाढले. सामाजिक बदल झाले. श्रीमंत-गरीब दरी रुंदावली. कार, दुचाकी, घर, परदेशी सहली, विमान प्रवास, मोठमोठ्या शाळांमध्ये मुलांचे शिक्षण इत्यादी गोष्टी मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात सहज आल्या. पण त्याची खूप मोठी किंमत मोजायला सुरुवात झाली आहे आणि त्याचे दुष्परिणाम गेल्या 5 ते 10 वर्षांपासून आपण बघत आणि भोगत आहोत. 

या कंपन्यांनी पर्यावरणाचा खेळ चालवला आहे. भूजल अदृष्य झाल्यासारखे आहे. पावसाचे पाणी एकतर बाष्पीभवनाने उडून जाते किवा समुद्राला मिळते. जमिनीतील पाणी या कंपन्या अनियंत्रितपणे खेचत आहेत. त्यामुळे जलस्त्रोत वेगाने रिकामे होत आहेत. आटलेल्या नद्या, विहिरी, तलाव आणि ओसाड जमिनी यामुळे वाळवंट वाढत आहेत. कंपन्यांच्या नफेखोरीचे उदाहरण म्हणजे मराठवाडा-विदर्भ या भागातून दहा रूपयांचे बटाटे घ्यायचे आणि आणि त्याचे 15 ते 20 रूपयांमध्ये मुठभर चिप्स विकायचे. अर्ध्यापेक्षा जास्त हवाच असते पिशवीत. पिशवी फुगलेली. आपल्याला वाटते केवढे चिप्स !

आपले पाणी वापरायचे. त्यात कीटकनाशक असल्याची तक्रार करायची आणि दोन-तीन रूपये निर्मिती खर्च असलेली कोल्ड्रिंक्स भरपूर नफ्याने विकायची. जाहिराती करायला सुपरस्टार्स आहेतच. लोक अभिमानाने खातात-पितात; मग तब्बेतीची वाट का लागेना ! अमीर खान आणि त्याची बायको पाण्यासाठी मोहीम राबवत आहेत. आधी या लोकांनी कोल्ड्रिंक्स, पिझ्झा, बर्गर इत्यादींच्या जाहिराती करू नयेत. तरच त्यांच्या प्रयत्नांना अर्थ आहे. नाहीतर उरतो तो प्रसिद्धीचा स्टंट. राजेंद्रसिंहांसारखे जलतज्ञ असताना त्यांची का नाही मदत घेतली जात नाही?

शेवटी जीवनमान उंचावणे, मजा करणे हे एक मर्यादेपर्यंतच ठीक आहे. याची किती किंमत पर्यावरण, आपली तब्येत, नैसर्गिक संसाधने यांनी मोजायची पण हे विचारण्याची कुवत असलेली माणसे आहेत का आज? उकाडा वाढला असे म्हणतो म्हणून आपण एसी लावतो. असे एक एक घरात 2 ते 3 एसी असतात. हे एसी बाहेर उष्ण हवा सोडणार. अशा हजारो एसींची किती उष्ण हवा बाहेर पडत असेल? किती सीएफसी बाहेर पडत असेल? याचा विचार किती जन करतात? मोठमोठ्या गप्पा आणि स्वार्थीपणा करायचा! स्वतःचे घर गारेगार ठेवायचे आणि स्वच्छ ठेवायचे मग बाहेरचा उकाडा, बाहेर ठेवलेला कचरा यांनी लोकांना त्रास झाला तर आम्हाला काय त्याचे अशी स्वार्थी आणि क्रूर भूमिका असणारी लोक आजूबाजूला दिसतील. आणखी लिहू तितके कमीच आहे. जे चाललेय ते पर्यावरणाला समाजाला, माणुसकीलाही विघातक आहे

Web Title: Jitendra Chandorkar blog on environment and contemporary issues