अभिषेक बच्चन, सचिन तेंडुलकर यांनी घेतले गणेश दर्शन

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीच्या गणपतीचे दर्शन घेतले. यंदा या गणपती मंडळाचे 125 वे वर्ष आहे. यानिमित्त मुंबईतील सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रातील विविध उच्च पदस्थ मोठ्या प्रमाणावर या मंडळास भेट देत आहेत. 

काल सायंकाळी अभिषेक बच्चन या गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. सचिन तेंडुलकर यांनी आज सकाळी गणेश दर्शन घेतले. अभिषेक बच्चन आणि सचिन यांचा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. 

सचिन यांना पाहण्यासाठी खाडिलकर रोड परिसरात आज मोठी गर्दी झाली होती. 