मनोरंजन विश्‍वात झळाळणार 'प्रीमियर सिने अवॉर्डस'!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

प्रवेश अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध
'प्रीमियर सिने अवॉर्डस'साठी 1 मे 2016 ते 30 एप्रिल 2017 या कालावधीत सेन्सॉर संमत झालेल्या किंवा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा विचार करण्यात येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी त्यांचे परीक्षण करतील. या पुरस्कारासाठीचे प्रवेश अर्ज http://esakal.in/primier/ येथे उपलब्ध असून, त्यासाठीच्या आवश्‍यक सूचनाही तेथे आहेत. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 मे 2017 असून, अधिक माहितीसाठी 8082030497 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

मुंबई : मनोरंजनाच्या क्षेत्रात आपल्या अंगभूत वेगळेपणाने झळाळणाऱ्या 'प्रीमियर' या मराठीतील एकमेव ग्लॅमर मॅगझिनतर्फे 'प्रीमियर सिने अवॉर्डस'ची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी निर्मात्या, दिग्दर्शकांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रातील उत्तमतेचा ध्यास घेतलेल्या निर्मात्या-दिग्दर्शकांना आणि कलाकारांना बळ देण्यासाठी, त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी आणि प्रेक्षकांचे लक्ष त्यांच्या कामगिरीकडे वेधण्यासाठी हे पुरस्कार असणार आहेत.

'सकाळ माध्यम समूहा'चे 'प्रीमियर' हे मराठीतील एकमेव ग्लॅमर मॅगझिन वाचकप्रिय तर ठरले आहेच; त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील निर्माते कलाकार तंत्रज्ञही मनोरंजन क्षेत्राची इत्थंभूत माहिती देणाऱ्या 'प्रीमियर'चे वाचक बनले आहेत. या साऱ्यांच्या पाठबळावर प्रीमियरने मनोरंजन विश्‍वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. समृद्ध अभिनयाची, सकस साहित्याची आणि कलात्मक निर्मितीची परंपरा लाभलेल्या मराठी सिनेमाची वाटचाल आता अधिकच लखलखती ठरते आहे. प्रीमियरच्या पुरस्काराने त्याला आगळे कोंदण लाभणार आहे. मराठी चित्रपटांच्या या समृद्ध परंपरेला आणि प्रीमियरच्या वेगळेपणाला शोभेल, अशा भव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होईल.

या सोहळ्याला कलाकारांची मांदियाळी तर असेलच; पण त्यांच्याबरोबरच राजकीय, तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. प्रीमियर सर्वोत्कृष्ट चित्रपट, प्रीमियर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, प्रीमियर सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री असे विविध पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात येतील. या पुरस्कार सोहळ्याची तयारी अत्यंत मोठ्या स्तरावरून सुरू झाली आहे. मराठी मनोरंजन विश्‍वात तो वाजेल आणि गाजेलही!