सलमान खानचे 'ते' वक्तव्य दुर्दैवी- आमीर खान

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जुलै 2016

मुंबई - बलात्कारासंदर्भात अभिनेता सलमान खान याने केलेल्या वक्तव्यावर आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यात आता अभिनेता अामीर खानच्या नावाची भर पडली आहे. सलमानने केलेले वक्तव्य मला माध्यमांतून समजले, त्यावेळी मी स्वतः हजर नव्हतो. सलमानचे हे वक्तव्य दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे, असे अामीरने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बलात्कारासंदर्भात सलमानने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पत्रकारांनी अामीरला छेडले असता त्याने वरिल प्रतिक्रिया दिली. सलमानला तुम्ही सल्ला देणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर सल्ला देणारा मी कोण? अशा प्रतिप्रश्‍न केला.
 
"या प्रकरणी माझे सलमानशी अद्याप बोलणे झालेले नाही. सलमानने जर अशा प्रकारचे वक्तव्य केले असेल तर ते अतिशय दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे,‘‘ असे अमीर म्हणाला. या प्रकरणी माफी मागण्याची मागणी होत असतानाही सलमानने मौन बाळगणे पसंत केले आहे. सुलतान या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी शारिरिक कष्ट केल्यामुळे माझी अवस्था बलात्कार झालेल्या महिलेसारखी होत असे, असे विधान सलमानने केले होते. या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर सलमानवर जोरदार टीका होत आहे. या प्रकरणी महिला आयोगाने सलमानला नोटीसही पाठविली आहे. अनेकदा मागणी होऊनही सलमानने या प्रकरणी माफी मागितलेली नाही.