नवरात्रीत प्रतिदिन सव्वाशे साडया परिधान करणारी 'दक्षिण मुंबईची महालक्ष्मी'

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई: दक्षिण मुंबईची महालक्ष्मी म्हणून ओळखली जाणारी 9व्वा कामाठीपूरा येथील वंदे मातरम् क्रीडा मंडळाची महालक्ष्मी माता यंदा जेजुरी गड देखाव्यात विराजमान झालेली आहे. संपूर्ण मुंबईतील ही अशी एकच नवसाची देवी विराजमान होते की तिला नवरात्रीतील अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसऱ्या पर्यंत दररोज सव्वाशेच्यावर (125) साडया परिधान कराव्या लागतात. देवीला साडी नेसविण्याचे काम निर्मलाताई पोटाबत्तीनी आजी अवघ्या तीन मिनिटांत लीलया करतात.

मुंबई: दक्षिण मुंबईची महालक्ष्मी म्हणून ओळखली जाणारी 9व्वा कामाठीपूरा येथील वंदे मातरम् क्रीडा मंडळाची महालक्ष्मी माता यंदा जेजुरी गड देखाव्यात विराजमान झालेली आहे. संपूर्ण मुंबईतील ही अशी एकच नवसाची देवी विराजमान होते की तिला नवरात्रीतील अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसऱ्या पर्यंत दररोज सव्वाशेच्यावर (125) साडया परिधान कराव्या लागतात. देवीला साडी नेसविण्याचे काम निर्मलाताई पोटाबत्तीनी आजी अवघ्या तीन मिनिटांत लीलया करतात.

गेली कित्येक वर्ष हा त्यांचा नवरात्रीतील नित्यनेम आहे. येथे अर्पण झालेली प्रत्येक साडी देवीला नेसविली जाते आणि त्या भाविकाला देवी सह फोटो काढून घेता येतो. हे कार्य दिवसभर सुरूच असते. त्यातही ख़ास बाब म्हणजे ही नवसाला पावनारी महालक्ष्मी असल्याने पुढील 2041 पर्यंत देवीची देणगी स्वरूपातील मूर्ती आगावू नोंदणी झालेली आहे. हे मंडळ सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सामान्य भक्तानाच मूर्ती नोंदीत प्राधान्य देत आहे. वंदे मातरम् क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सूर्यप्रकाश यलगोंडा हे स्वतः साडी विक्रेते आहेत तर दूसरे कार्यकर्ते मनोरुग्ण तज्ञ डॉ. आशीष गोसर आहेत. त्यांचा भाऊ कुणाल गोसर यांचा औषध निर्मितीचा कारखाना आहे. रत्नपुरोलु, हरीश्चन्द्र शिंदे यांचेसह आणखी काही कार्यकर्ते हे इंजीनियर, कामगार आणि सर्व सामान्य वर्गणीदार आहेत. त्यांच्या कष्टावर हे मंडळ नवरात्र उत्सव साजरा करीत आहे. महालक्ष्मीचा आशीर्वादमय वरद हस्त 20 तोळे शुद्ध सोन्यापासून साकारण्यात आलेला आहे. गळ्यातील मंगळ सूत्रासहित अन्य दागिने सोन्याचे आणि अत्यंत किंमती आहेत.

मुंबई, पुणे, नाशिक, कर्नाटक, हैदराबाद येथील भाविक भक्त येथे महालक्ष्मीच्या दर्शनार्थ येऊन नवसपूर्ती करतात. रोज 100-125 साडी अर्पण होत असते. सोन्याच्या अलंकारिक वस्तु, चांदीचे पाळणे हे नवस पूर्तित प्रामुख्याने अर्पण केल्या जातात. देवीची खणा नारळाने ओटी भरताना जमा होणारे तांदूळ हे 400 किलो पेक्षा जास्त असतात. हजारांच्या आसपास नारळ जमा होतात. त्याचा दुर्गा अष्टमी होम हवनास महाप्रसाद आणि गरीबाना वाटप करण्यात येते. 1980 साली दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी संप केला. संप लांबला आणि संपात लाखो कामगार देशोधड़ीला लागले. त्यात मोठ्या संख्येने येथील लोकांचा रोजगार बुडाला. घरात अन्नान्नदशा झाली आणि येथील लोकांनी पोटापाण्यासाठी देवी समोर हात जोडीत आमचा सांभाळ कर अशी अर्जव- याचना केली. त्यांनी आपल्या राहत्या घरातच मुलाबाळांसह कपड़ा व्यवसाय सुरु केला. नंतर घराची दुकाने करीत कपडे विक्रीत तुकड़ा, दुपट्टा, साडया विकुन बेरोजगारी वर मात करीत आज येथे KP (कामाठी पूरा) मार्केट उभारले आहे. आम्ही आज या महालक्ष्मी च्या कृपेनेच जीवंत असून, सुखी आहोत अशी येथील स्थानिकांची श्रद्धा आणि विश्वास आहे.

दसऱ्यादिनी आपटयाचे सोने लुटण्याचा बहारदार कार्यक्रमात महिलांची संख्या हजारोंवर असते. देवीची विसर्जन मिरवणुकीस हजारोच्या संख्येने भाविक जमतात. नागपाड़ा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बसवंत यांनी येथे उत्सवा दरम्यान अनुचित घटना घडू नये म्हणून विशेष पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. आम्हाला येथे राउंडअप करावा लागतो, असे बीट मार्शल सचिन गायकवाड़ यांनी सांगितले.