माझगावमधील कारखान्यात 10 कोटींची वीजचोरी उघड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

बेस्टच्या पथकाने 2011मध्येही केली होती दंडवसुली

बेस्टच्या पथकाने 2011मध्येही केली होती दंडवसुली
मुंबई - बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाच्या इतिहासातील सर्वांत मोठी अशी 10 कोटींची वीजचोरी उघडकीस आली आहे. प्लास्टिकची चहाची गाळणी उत्पादित करणाऱ्या या कारखान्यावर यापूर्वीही वीजचोरीच्या प्रकरणात कारवाई झाली होती. तरीही येथे वीजचोरी सुरू होती. या कारखान्यात रात्रभर मीटर बायपास करून वीजचोरी केली जात होती. दिवसा मीटरमधून वीज वापरली जात असे.

माझगावमधील सीताफळवाडी येथील बॉम्बे टी स्ट्रेनिंग मॅन्युफॅक्‍चरिंग कंपनीतील तीनपैकी दोन मीटरमधून वीजचोरीचा प्रकार उघड झाला आहे. एक मीटर संशयास्पद वाटल्याने प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. या मीटरवर कोणताही डिस्प्ले नाही. रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत ही वीजचोरी 2011 पासून सुरू होती. चार यंत्रांसाठी 22 किलोवॉटचे मीटर वापरले जात होते. वीज वापरासाठी बायपास केल्याने सरसकट थेट शून्यावर या मीटरचे रीडिंग येत असे. रात्रभर वीज वापरूनही मीटरमध्ये कोणतीही आकडेवारी दिसत नव्हती. बेस्टच्या मूळ वीजपुरवठा करणाऱ्या केबलमधूनच ही बायपासद्वारे विजेची चोरी होत होती. 20 हजार ते 25 हजार युनिटऐवजी अवघे पाचशे युनिट रीडिंग येत असे. त्यामुळे बेस्टच्या दक्षता पथकाचे अधिकारी या वीज वापरावर लक्ष ठेवून होते. बेस्टचे अधिकारी पोहचणार अशी माहिती मिळताच अनेकदा बायपाससाठी वापरलेली संपूर्ण वायरिंग लपवली जात असे. सातत्याने रात्री वीज वापरात झालेली घट पाहूनच बेस्टच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सापळा रचला.

पथकाला थांबवून ठेवले
बेस्टचे दक्षता पथक येताच त्याला 10 मिनिटे बाहेरच ठेवण्यात आले. मीटर केबिनपर्यंत जाण्यासाठी गेटच उघडण्यात आले नाही. दरम्यानच्या काळात बायपाससाठीच्या वायर काढण्यात आल्या. पथकाने संपूर्ण वायरिंग तपासून वीजचोरी पकडली. यापूर्वी 2011 मध्ये बेस्टच्या पथकाने याच कारखान्यात 90 लाखांची वीजचोरी पकडली होती. त्यावेळी दंडाची रक्कम भरल्यावर कारखान्याचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता.

मुंबई

मुंबईः विजांच्या कडकाडाटासह सुरू झालेल्या पावसाने 29 जुलैची मुंबईकरांना आठवण करून दिली. शहरात 28.71 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 28.93...

06.36 PM

ठाणे: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल इब्राहीम कासकर याने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना फोन करून...

04.24 PM

कल्याण : चक्क बंद पडलेल्या केडीएमटी बसचा आसरा घेत फेरीवाल्यांनी व्यवसाय सुरू करत जणू काही 'फुग्यासह केडीएमटी बस विकणे आहे'...

04.00 PM