कोकणसाठी १३२ फेऱ्या

कोकणसाठी १३२ फेऱ्या

मुंबई - मध्य आणि कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरिता १३२ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, पुणे, करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेडणेदरम्यान ५ सप्टेंबरपासून विशेष गाड्या धावणार आहेत. ३० जूनपासून त्याचे आरक्षण सुरू होईल. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.   

सीएसएमटी ते सावंतवाडी गाडी आठवड्यातून सहा दिवस धावणार असून ४४ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी ५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत गुरुवार वगळता उर्वरित दिवस रात्री १२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २.१० वाजता सावंतवाडीला पोहचेल. ५ ते ३० सप्टेंबर कालावधीत ती सावंतवाडीहून गुरुवार वगळता रात्री ३ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ३.४० ला सीएसएमटीला पोहचेल.

पुण्याहूनही गाडी
पुणे-सावंतवाडीदरम्यान विशेष साप्ताहिक चार फेऱ्या चालवण्यात येतील. ७ ते १५ सप्टेंबरला त्या फेऱ्या होतील.

०१००१/०१००२ मुंबई सीएसटी-सावंतवाडी रोड ५ ते ३० सप्टेंबरदरम्यान गुरुवार वगळता धावणार आहे. 
०१००७/०१००८ मुंबई सीएसटी-सावंतवाडी रोड ६, १३, २० आणि २७ सप्टेंबरला मुंबईतून सुटेल. 
०१०३३/०१०३४ मुंबई सीएसटी-रत्नागिरी ५ ते १५ सप्टेंबर कालावधीत धावणार. 
०१०३५/०१०३६ पनवेल-सावंतवाडी रोड ७ ते १७ सप्टेंबर कालावधीत रोज. 
०११८७/०११८८ एलटीटी-रत्नागिरी-एलटीटी डबल डेकर ४, ११ आणि १८ सप्टेंबर अशी आठवड्यातून एकदा. 
०१०३७/०१०३८ एलटीटी-पेडणे-एलटीटी ७, १४ व २१ सप्टेंबरला धावणार आहे. 
०१०३९/०१०४० एलटीटी-झाराप-एलटीटी- ३ ते २४ सप्टेंबर कालावधीत फक्त सोमवारी धावणार. 
०१०३१/०१०३२ पुणे-सावंतवाडी रोड-पुणे विशेष गाडी १० सप्टेंबर. 
०१४४७/०१४४८ पुणे-सावंतवाडी रोड-पुणे ७ आणि १४ सप्टेंबर. 
०१४३३/०१४३४ पनवेल-सावंतवाडी रोड पनवेल स्पेशल गाडी ११ सप्टेंबर. 
०१४३५/०१४३६ पनवेल-सावंतवाडी रोड पनवेल १२ सप्टेंबर. 
०१४४९/०१४५० पनवेल-रत्नागिरी-पुणे स्पेशल गाडी ८ आणि १५ सप्टेंबरला पनवेलहून रात्री १०.४५ वाजता सुटेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com