दहा वर्षांत मुंबईतल्या 16 नगरसेवकांची पदे रद्द 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई - बनावट जात प्रमाणपत्र सादर केलेल्या आणि दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या मुंबईतील 16 नगरसेवकांना गेल्या दहा वर्षात आपले पद गमवावे लागले आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना महापालिका सचिव कार्यालयानेच ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे 2007 ते 2012 या या पाच वर्षात सर्वाधिक म्हणजे 12 नगरसेवकांचे पद्द रद्द झाले आहे. 

बनावट जातप्रमाणपत्र सादर केलेल्या 14 नगरसेवकांचे पद जातपडताळणीनंतर तर दोन नगरसेवकांचे पद त्यांना दोन पेक्षा अधिक मुले असल्याचे आढळून आल्यामुळे रद्द करण्यात आले. शिरिष चोगले, सुनिल चव्हाण, लालजी यादव, रश्‍मी पहुडकर, नारायण पवार, प्रवीण देव्हारे, विश्‍वनाथ महाडेश्‍वर, सुभाष सावंत, अंजुम असलम, सिमिंतीनी नारक आणि भारती धोंगडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याने 2007 मध्ये त्यांचे पद रद्द करण्यात आले. तर गुलशन चौहान यांना दोन पेक्षा अधिक मुले असल्याचे आढळून आल्याने पद सोडावे लागले होते. भावना जोबनपुत्र, महंमद इसाक, कोडम अनुपा आर यांना बनावट जातप्रमाणपत्रामुळे तर शेख सिराज याला दोनपेक्षा अधिक मुलांमुळे 2012मध्ये नगरसेवकपद गमवावे लागले. गलगली यांना सहाय्यक महापालिका सचिव प्रमोद गिरी यांनी ही माहिती दिली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर ही माहिती अजून प्रसिद्ध करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: 16 corporators canceled posts