रुबिना मेमनच्या "फर्लो'ला नकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी रुबिना मेमन हिला फर्लो रजा मंजूर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. तिला फर्लो मंजूर केली आणि ती मुंबईत आली, तर तिच्या सांत्वनासाठी अनेक जण पोहचतील. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, असा सरकारी पक्षाचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने रुबिनाचा अर्ज फेटाळला.

रुबिना बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी झालेल्या याकूब मेमनच्या भावाची पत्नी आहे. दहशतवादी कृत्य केल्याप्रकरणी टाडा न्यायालयाने दोषी ठरवल्याने रुबिनाला फर्लो रजा मिळू शकणार नाही, असेही उच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले. न्या. विजया कापसे ताहिलरमानी आणि एम. ए. बडार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. 1993 च्या बॉम्बस्फोटातील कटात सहभागी आणि सध्या पाकिस्तानात असलेल्या टायगर मेमनची रुबिना वहिनी आहे. 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातून रुबिनाच्या पतीची मात्र सबळ पुराव्याअभावी सुटका झाली आहे. रुबिना सध्या पुण्यातील येरवडा तुरुंगात आहे. फर्लो रजेसाठी तिने केलेला अर्ज मेमध्ये टाडा न्यायालयाने फेटाळल्याने तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याच प्रकरणात शिक्षा झालेल्या तिघांना फर्लो मंजूर झाल्याचे रुबिनाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले; मात्र या युक्तीवादाला विरोध करत सरकारी वकिलांनी 2012 मधील तुरुंग अधिनियम कायद्यातील परिपत्रक सादर करत टाडा कायद्यांतर्गत शिक्षा झालेल्यांना फर्लो देता येत नसल्याचे सांगितले.

मुंबई

नवी मुंबई  - भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी दुपारपासून नवी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली...

08.09 PM

मुंबईः विजांच्या कडकाडाटासह सुरू झालेल्या पावसाने 29 जुलैची मुंबईकरांना आठवण करून दिली. शहरात 28.71 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 28.93...

06.36 PM

ठाणे: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल इब्राहीम कासकर याने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना फोन करून...

04.24 PM