'जीएसटी'साठी आता 20 मेपासून अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

मुंबई - वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय शनिवारी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आता 17 मेऐवजी 20 मेपासून सुरू होईल.

देशात येत्या 1 जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयकाला मान्यता देण्यासाठी सरकारने सुरवातीला 17 ते 19 मेदरम्यान अधिवेशन घेण्याचे ठरवले होते; मात्र 18 आणि 19 मे रोजी नवी दिल्लीत जीएसटीच्या संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उपस्थित राहावे लागणार असल्याने अधिवेशनाच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष अधिवेशनाच्या नव्या तारखांबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.