23 लाखांचे एम्फेटामाईन जप्त 

23 लाखांचे एम्फेटामाईन जप्त 

मुंबई -: एम्फेटामाईन या अमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी मंगळवारी (ता. 18) सहार विमानतळावरून फुरकाना शेख हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून 465 ग्रॅम एम्फेटामाईन जप्त करण्यात आले. पुढील तपास अमली पदार्थ विरोधी कक्षाचे कांदिवली युनिट करीत आहे. 

जप्त केलेल्या एम्फेटामाईनची किंमत 23 लाख 25 हजार रुपये आहे. मुंबईची रहिवासी असलेली फुरकाना ही डोहा येथे जाणार होती. विमानतळावर तिच्या बॅगेबाबत गस्तीवरील अधिकाऱ्यांना संशय आला. अमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण कदम यांचे पथक घटनास्थळी गेले. श्‍वानपथकाने फुरकानाच्या बॅगेची तपासणी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com