बॅंक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 40 लाख कोटींचे व्यवहार ठप्प 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 मे 2018

मुंबई - वेतनवाढीच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक कर्मचाऱ्यांचा 48 तासांचा संप आज सकाळी सहापासून सुरू झाला. यामध्ये बॅंकेच्या सेवा शाखांसह सर्व विभागातील कर्मचारी सहभागी झाल्याने महाराष्ट्रात सुमारे 40 लाख कोटींचे आर्थिक व्यवहार होऊ शकले नाहीत. उद्याही हा संप कायम राहणार असून, युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनच्या 9 सलग्न संघटनांचे आठ ते नऊ लाख कर्मचारी त्यामध्ये सहभागी होणार आहेत. 

राज्यात सार्वजनिक बॅंकांच्या चार हजार शाखा आहेत. आजच्या संपात एसबीआय, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बॅंक, देना बॅंक, सिंडिकेट आदी बॅंकांमध्ये युनियनचे प्राबल्य असल्याने कामकाजावर मोठा परिणाम झाला. खासगी आणि नागरी सहकारी बॅंकांचे कामकाज मात्र सुरळीत सुरू होते. 

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरसह विविध ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सरकारविरोधात निदर्शने केली. मुंबईत आझाद मैदानात हजारो बॅंक कर्मचाऱ्यांनी दुपारी 2 पर्यंत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. देशभरामध्ये बंदला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी केला. 

Web Title: 4,00,000 crores of rupees have been stalled due to bank employees' strike