फॅशन स्ट्रीटवरील 43 विक्रेत्यांचे परवाने रद्द

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

मुंबई - चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीटवर नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करणाऱ्या 43 स्टॉलधारकांचे परवाने पालिकेने रद्द केले आहेत. त्यांना 24 तासांत तेथील जागा सोडण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. फॅशन स्ट्रीटवर 394 परवानाधारक विक्रेते आहेत. नियमानुसार ठरलेल्या जागेत त्यांनी व्यवसाय केला पाहिजे. मात्र नियमांचे उल्लंघन करत दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागेत दुकान लावले जाते. अशा नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांवर महापालिकेच्या कुलाबा येथील "ए' विभाग कार्यालयाने कारवाई केली.