मानवी तस्करीप्रकरणी आणखी पाच जण अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

अल्पवयीन मुलांना परदेशी नेल्याचे उघड
मुंबई - बनावट कागदपत्रांच्या साह्याने अल्पवयीन मुलांना परदेशात घेऊन जाणाऱ्या टोळीतील आणखी पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

अल्पवयीन मुलांना परदेशी नेल्याचे उघड
मुंबई - बनावट कागदपत्रांच्या साह्याने अल्पवयीन मुलांना परदेशात घेऊन जाणाऱ्या टोळीतील आणखी पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

जोगेंद्र सिंग (गोरेगाव), सलीम डेरैया (जोगेश्‍वरी), सोहेल शेख (माहीम), संजय परदेशी (जुहू) व मोहम्मद रफीक शेख (गोरेगाव) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या अटकेमुळे या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या 11 झाली आहे. या टोळीचे धागेदोरे हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत पोचले आहेत. यापूर्वी अटक केलेले आरोपी आरिफ शफी फारुख, राजेश बळिराम पवार व फातिमा फरीद अहमद यांनी चित्रपटसृष्टीत काम केले आहे. फातिमा हिने अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांत केशभूषाकार म्हणून काम केले आहे. फारूख हा छायाचित्रकार आणि पवार सहायक कॅमेरामन आहे. पवारने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरणाचे काम केले आहे.

अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत डेरैया, परदेशी व शेख यांनी यापूर्वी अल्पवयीन मुलांना अनेकदा परदेशी नेल्याचे निष्पन्न झाले आहे. जोगेंद्र सिंग व सोहेल शेख यांनी बनावट कागदपत्रांच्या साह्याने मुलांची पारपत्रे तयार करण्यात मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: 5 arrested in human smuggling