565 तळीराम चालकांची उतरली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

मुंबई - मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवणारे 565 जण 31 डिसेंबरच्या रात्री वाहतूक पोलिसांच्या कचाट्यात सापडल्याने त्यांची उतरली, तर सुसाट गाड्या चालवणाऱ्या 13 जणांना दंड केल्याने त्यांना धडा मिळाला आहे. 

मुंबई - मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवणारे 565 जण 31 डिसेंबरच्या रात्री वाहतूक पोलिसांच्या कचाट्यात सापडल्याने त्यांची उतरली, तर सुसाट गाड्या चालवणाऱ्या 13 जणांना दंड केल्याने त्यांना धडा मिळाला आहे. 

पोलिसांनी 31 डिसेंबरच्या रात्री तळीराम चालकांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. नाकाबंदीही केली होती. सिग्नल तोडणे, वेगाने वाहन चालवणे, ट्रिपल सीट आणि विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना पोलिसांनी अडवले. गिरगाव चौपाटीवर वाहतूक कोंडीमध्येही स्टंटबाज सुसाट दुचाकी चालवत होते. जागोजागी बंदोबस्त असूनही अनेक वाहने आणि दुचाकी सुसाट जात होत्या. ही सर्व वाहने नाकाबंदीच्या कचाट्यात सापडत होती. 

पोलिसांनी रविवारच्या पहाटेपर्यंत 565 मद्यपी चालकांवर कारवाई केली. गेल्या वर्षी ही सख्या 705 होती. व्यापक बंदोबस्तामुळे यंदा हे प्रमाण कमी झाले असावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. नशेत बेधुंद वाहने चालवणाऱ्या 13 जणांना पोलिसांनी दंड केला. विनाहेल्मेटने मोटरसायकल चालवणाऱ्या 207 जणांनाही दंड करण्यात आला. 

मुंबई

मिरारोड : मीरा-भाईंदर महापालिकेसाठी आज रविवार सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीे. सकाळ पासूनच शहरात पावसाने हजेरी...

11.15 AM

धारावी : नातू मानलेल्या 15 वर्षांच्या शेजारच्या मुलाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धारावीतील एक आजीबाई शीव रुग्णालयात...

10.03 AM

कुलगुरू, शिक्षण मंत्र्यांवर आरोप मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाला कुलगुरू आणि राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना...

10.03 AM