पावसाळ्यात 66 धोकादायक ठिकाणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

मुंबईत तासाला 50 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास पाणी साचण्यास सुरुवात होते. 18 व 19 जून 2015 मध्ये मुंबईत तासाला 300 मि.मी. पाऊस झाला होता.

मुंबई : पावसाळ्यात पाणी तुंबून वाहतूक कोंडी होऊ शकते, अशी तब्बल 66 ठिकाणे महापालिकेने निश्‍चित केली आहेत. 2015 मध्ये दोन दिवस झालेल्या तुफान पावसानंतर पालिकेने सर्वेक्षण करून ही ठिकाणे निश्‍चित केली आहेत. त्याचबरोबर अन्य 119 ठिकाणी पाणी भरण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी पाणी उपसणारे 313 पंप बसविण्यात येणार आहे.

मुंबईत तासाला 50 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास पाणी साचण्यास सुरुवात होते. 18 व 19 जून 2015 मध्ये मुंबईत तासाला 300 मि.मी. पाऊस झाला होता. त्यानंतर पालिकेने प्रभागातील अधिकारी, पाणलोट अधिकारी आणि सल्लागाराकडून अहवाल घेऊन 66 क्रॉनिक स्पॉट निश्‍चित केले. या ठिकाणी पाणी तुंबल्यावर वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेने येथे अतिरिक्त कुमक पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी साचलेले पाणी उपसण्यासाठी उच्च क्षमतेचे पंप बसवणार आहे.

वर्ष : क्रॉनिक ठिकाणे
2012 : 55 क्रॉनिक ठिकाणे
2013 : 40 (नाले रुंदीकरण पम्पिंग स्टेशनमुळे घट)
2015 : 66

पाणी तुंबून वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे
शहर
- पी. डी'मेलो रोड, वाडी बंदर, मुंबई सेंट्रल, हिंदमाता, दादर टीटी, किंग्ज सर्कल, वडाळा स्थानक

पश्‍चिम उपनगर
- जुहू तारा रोड, एसव्ही रोड जंक्‍शन सांताक्रुझ, भोगले चौक सांताक्रुझ, जय भारत सोसायटी खार, गझदरबंद खार, मालाड आणि दहिसर सबवे, मरोळ मार्केट अंधेरी कुर्ला रोड, विरा देसाई मार्ग अंधेरी.

पूर्व उपनगर
कुर्ला स्थानक पूर्व, लाल बहादूर शास्त्री मार्ग, शितल सिनेमा कुर्ला, प्रीमियर रोड कुर्ला, फातीमा हायस्कुल किरोळ, चिरागनगर घाटकोपर, सिंधी कॉलनी चेंबूर.