घाटकोपरमध्ये 690 कोटींचा श्रीमंत उमेदवार! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

घाटकोपर - मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची यंदाची चुरस ऐतिहासिक ठरणार असल्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवरून मिळत आहेत. युतीची बोलणी फिसकटल्याने भाजप मोठ्या आत्मविश्‍वासाने कामाला लागला असून घाटकोपर पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 132 मध्ये कॉंग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांचे आव्हान मोडून काढण्यासाठी त्यांनी पराग शहा यांच्या रूपाने अब्जाधीश उमेदवार रिंगणात उतरवला आहे. शहा यांची मालमत्ता तब्बल 360 कोटींची असून मुंबईतील ते सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले पराग शहा सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. शहा यांनी कॉंग्रेसच्या प्रवीण छेडा यांना आव्हान निर्माण केले आहे. घाटकोपर पूर्व हा गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांचा बालेकिल्ला समजला जातो. या प्रभागात कॉंग्रेसच्या प्रवीण छेडा यांचेही वर्चस्व आहे. महेता व छेडा यांच्यातील वाद जगजाहीर आहे. छेडा यांना राजकारणातून बाद करण्यासाठी महेता यांनी श्रीमंत उमेदवार उभा केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहा व छेडा यांच्यातील लढत अटीतटीची मानली जात आहे. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात शहा यांनी आपली मालमत्ता जाहीर केली आहे. 

मला लोकसेवा करायचीय! 
कोट्यवधीची संपत्ती असताना आमदार वा खासदार होण्याऐवजी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबत निर्णय पराग शहा यांनी घेतला आहे. त्याबाबत ते म्हणाले, की खासदार आणि आमदारापेक्षा नगरसेवक नागरिकांच्या अधिक जवळ असतो. मला लोकांची सेवा महत्त्वाची वाटली. पैसा कमावून नाव वाढवण्यापेक्षा मला लोकांमध्ये जाऊन त्यांची सेवा करायची आहे. सेवेतूनच माझी ओळख बनवायची आहे. त्यामुळेच मी पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 

Web Title: 690 crore in the richest candidate in Ghatkopar