मुंबईत सात लाखांचे चरस जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

मुंबई - काश्‍मीरहून चरस घेऊन आलेल्या दोघांना घाटकोपर अमली पदार्थविरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून 1 हजार 800 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत 7 लाख 20 हजार आहे.

मुंबई - काश्‍मीरहून चरस घेऊन आलेल्या दोघांना घाटकोपर अमली पदार्थविरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून 1 हजार 800 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत 7 लाख 20 हजार आहे.

नियार अहमद गुलामनबी भट आणि इलियास इस्माइल शेख अशी आरोपींची नावे आहेत. नियार हा मूळचा काश्‍मीरचा; तर इलियास हा मुंबईचा रहिवासी आहे. ते दोघेही परस्परांचे नातलग आहेत. काही वर्षांपासून ते अमली पदार्थ विक्रीच्या धंद्यात आहेत. ते चरसविक्री करण्यासाठी कुर्ल्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. इलियासविरोधात 2004 मध्ये एक गुन्हा दाखल आहे.