विमानतळावर 70 लाखांचे सोने जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई - छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वच्छतागृहातून 70 लाख रुपयांचे सोने हस्तगत करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) बुधवारी पहाटे ही कारवाई केली. या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्हींची पडताळणी करण्यात येत आहे. त्याच्यामार्फत काही संशयितांची ओळख पटवली असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. दागिन्यांच्या स्वरूपात 1.3 किलो, तर एक किलो वजनाचे बारही सापडले आहेत. या सर्व सोन्याची किंमत 70 लाख 65 हजार रुपये आहे. कन्वेअर बेल्ट पाचच्या समोरील पुरुषांच्या स्वच्छतागृहातील कचराकुंडीतून काळ्या पुड्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्यात हे सोने होते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.