वाशीत ७१ हजारांचे दागिने पळवले

वाशीत ७१ हजारांचे दागिने पळवले

नवी मुंबई - एका ६२ वर्षांच्या महिलेचे ७१ हजार रुपये किमतीचे दागिने एका भामट्याने लुबाडून नेल्याची घटना गुरुवारी (ता. २०) भरदुपारी वाशीतील सेक्‍टर-९ भागात घडली.  

वाशी सेक्‍टर-१५ भागात राहणाऱ्या चिरांजी शर्मा भाजी आणण्यासाठी बाजारात गेल्या होत्या. या वेळी त्यांच्याजवळ आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना पुढे ज्येष्ठ नागरिक व गरीब लोकांना चप्पल, साडी व ११०० रुपये वाटण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचे सांगून त्यांना वाशी सेक्‍टर-९ मधील अवनी सोसायटीजवळ नेले. त्यानंतर त्यांना गरीब दिसण्यासाठी अंगावरील सोन्याचे दागिने पिशवीत ठेवण्यास सांगून त्यांचे दागिने आपल्याकडे घेतले. त्यानंतर हातचलाखी करून त्यांचे दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र, दीड तोळ्याचे कानातील झुमके, तीन अंगठ्या आणि एक हजाराची रोख रक्कम असा सुमारे ७१ हजारांचा ऐवज चोरला. काही वेळांनतर चिरांजी शर्मा यांनी पिशवीची तपासणी केल्यानंतर दागिने नसल्याचे आढळून आले. त्यांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com