भायखळा तुरुंगातील 81 महिला कैद्यांना बाधा

Bhaykhala-Jail
Bhaykhala-Jail
मुंबई - भायखळा तुरुंगातील 81 महिला कैद्यांना शुक्रवारी उलट्या, जुलाब, मळमळ, पोटदुखीचा त्रास होऊ लागण्याने तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधा झालेल्यांत दोन गर्भवती आणि चार महिन्यांच्या मुलांचाही समावेश आहे. तुरुंगातील पाणी, अन्न आणि रुग्णांचे वैद्यकीय तपासणीचे अहवाल आल्यावरच या बाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यानंतर सविस्तर चौकशी केली जाणार आहे. तुरुंग प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. सकाळी एका महिला कैद्याला उलट्या झाल्यानंतर बॅरेकमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या गोळ्यांमुळे उलट्या होत असाव्यात, या भीतीपोटी महिलांनी तुरुंगातील डॉक्‍टरकडे तक्रारी केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com