तीन दिवसांत 88 लाखांचे सोने जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) गेल्या तीन दिवसांत कारवाई करून तब्बल 88 लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. एलईडी टीव्हीमधून सोन्याची तस्करी करणाऱ्याला रविवारी (ता.5) एआययूने सहार विमानतळावर ताब्यात घेतले. अब्बाला रमीज असे त्याचे नाव आहे. चालू वर्षात एआययूने तस्करांवर कारवाई करून अडीच कोटी रुपयांची मालमत्ता (सोने, चलन) जप्त केली आहे. 

रविवारी रात्री रमीज हा अबुधाबी येथून सहार विमानतळावर आला होता. रमीजकडील साहित्याची एआययूने झडती घेतली. त्याने 32 इंच एलईडी टीव्हीमध्ये सोने लपवून आणले होते. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 31 लाख 68 हजार इतकी आहे. एआययूने तस्करीत वापरलेले सोने आणि टीव्ही जप्त करून रमीज विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. 

सोने तस्करीकरता ज्युसर, पोर्टेबल मशिनसह आता एलईडी टीव्हीचाही वापर होऊ लागला आहे. परदेशातून सोने, चलन आदी वस्तूंची तस्करी करणाऱ्यांवर हवाई गुप्तचर विभाग लक्ष ठेवून असते. विमानतळावर कॅरिअरवर कारवाई होत असल्याने परदेशातील मोठे तस्कर चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे आता तस्करांनी आपला मोर्चा दिल्ली, चेन्नई विमानतळाकडे वळवला आहे. एआययूने गेल्या तीन दिवसांत कारवाई करून तब्बल 88 लाख रुपयांचे सोने जप्त केले.

Web Title: 88 lakh seized gold