आरेमधील आरक्षण बदलण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

मुंबई - आरे वसाहतीतील 33 हेक्‍टर जमिनीवर "मुंबई मेट्रो-3' प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याच्या कारशेडसाठी चार हजार झाडे तोडावी लागणार आहेत. मेट्रोसाठी या जागेचे आरक्षण बदलण्यास कॉंग्रेसने विरोध केला आहे. सुधार समितीच्या गुरुवारी (ता. 11) होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावाला कडाडून विरोध होण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेसह विरोधी पक्ष भाजपला एकटे पाडण्याची दाट शक्‍यता आहे.
आरेची जमीन कारशेडला देण्यास पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी विरोध दर्शविला आहे. कारशेडसाठी आरे वसाहतीत जागा निश्‍चित करण्यात आली आहे. मुंबईतील प्रस्तावित विकास आराखड्यात हे आरक्षण आहे. आरेतील 33 हेक्‍टर जमीन मेट्रो कारशेड, वर्कशॉप व वाणिज्य वापरासाठी आरक्षित करा, असा प्रस्ताव नगरविकास विभागाने पालिकेकडे पाठवला आहे. या विभागाने केलेल्या सूचनेप्रमाणे पालिकेने आरेमधील आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीसमोर सादर केला आहे.

सुधार समितीतही शिवसेना आणि भाजप सदस्यांची संख्या जवळपास समान आहे. राज्य सरकार भाजपचे असल्याने मेट्रो प्रकल्पासाठी लागणारी आरेची जागा मिळवून देण्यासाठी भाजपचे सदस्य प्रस्तावाच्या बाजूने असतील. झाडे तोडण्यास भाजप वगळता शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह सर्वच पक्षांचा विरोध असल्याने सुधार समितीच्या गुरुवारी (ता. 11) होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावावर खडाजंगी होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: aarey colony reservation changes oppose