आसूड यात्रा गुजरातमध्ये अडविली

मुंबई - आसूड यात्रेला गुजरातमध्ये प्रवेश करण्यास गुजरात पोलिसांनी गुरुवारी प्रतिबंध केला. आमदार बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील यांच्यासह कार्यकर्ते व शेतकऱ्यांना गुजरात पोलिसांनी अटक केली.
मुंबई - आसूड यात्रेला गुजरातमध्ये प्रवेश करण्यास गुजरात पोलिसांनी गुरुवारी प्रतिबंध केला. आमदार बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील यांच्यासह कार्यकर्ते व शेतकऱ्यांना गुजरात पोलिसांनी अटक केली.

मुंबई - आमदार बच्चू कडू यांच्या नेतत्वाखाली निघालेल्या आसूड यात्रेला गुजरात पोलिसांनी गुजरातमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध केला. आमदार कडू, रघुनाथदादा पाटील, कार्यकर्ते व शेतकऱ्यांना गुजरात पोलिसांनी अटक केली.यासंबंधी राज्य सरकारने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी करत राज्यभरात आसूड यात्रा काढण्यात आली आहे. गुजरात पोलिसांनी आसूड यात्रेत सहभागी झालेल्या आमदार बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी यांना अटक केली. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी भाजप सरकारचा निषेध नोंदवला आहे.

याबाबत आमदार कडू म्हणाले, ‘गुजरातच्या सीमेवरच आम्ही ठिय्या करणार आहोत. गुजरात सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आसूड यात्रेस प्रवेश नाकारून न्याय मागणी ठोकारली आहे. हे सरकार हुकूमशाहप्रमाणे वागत आहे.’ गुजरात सरकार विनाकारण परिस्थिती स्फोटक करत असून वातावरण दूषित करण्याचे काम पोलिसांनी केल्याचा आरोपही कडू यांनी केला.

नागपुरातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वडनगर (गुजरात) येथील घर अशा आसूड यात्रेस ११ एप्रिलपासून प्रारंभ झाला होता. शुक्रवारी (ता.२१) वडनगर येथे यात्रेचा समारोप होता.

सरकारने आमचे आंदोलन बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केला आहे. अपंग आंदोलकांवर लाठीमार केला. याची किंमत सरकारला मोजावी लागेल. मोदींच्या गुजरातमध्ये न्याय मागता येत नाही हे दुर्दैव आहे.
- आमदार बच्चू कडू, अध्यक्ष प्रहार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com