अभिजित भट्टाचार्यचे ट्विटर अकाउंट सस्पेंड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मुंबई - गायक अभिजित भट्टाचार्य याचे ट्विटर अकाउंट ट्विटर इंडियाने सस्पेंड केले आहे. काही दिवसांपासून तो अनेक वादग्रस्त ट्विट करत होता. त्यानंतर भारतीयांनी त्याचे अकाउंट रिपोर्ट केले होते. ट्विटरने कठोर पावले उचलत त्याचे अकाउंट सस्पेंड केले आहे. त्याच्या यूझर आयडीवर क्‍लिक केल्यास "अकाउंट सस्पेंडेड' असा मेसेज दिसत आहे; पण ट्विटरने त्याचे अकाउंट मर्यादित काळासाठी सस्पेंड केले आहे की कायमचे, हे अजून स्पष्ट केलेले नाही.

ट्विटरच्या पॉलिसीप्रमाणे कोणत्याही व्यक्तीबद्दल अपमानजनक शब्द किंवा अभद्र बोलल्यास त्या ट्विट करणाऱ्या व्यक्तीचे अकाउंट सस्पेंड केले जाते. 22 तारखेला अभिजित भट्टाचार्यने काही महिलांवर ट्विटरद्वारे अभद्र टिप्पणी केली होती. त्यानंतर अनेकांनी अभिजितचे अकाउंट रिपोर्ट करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या पॉलिसीत असे स्पष्ट लिहिण्यात आले आहे, की असे अकाउंट कायमस्वरूपी बंद करता येते.