आदित्य ठाकरेंच्या कारला अपघात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

मुंबई- युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कारला आज (रविवार) अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झालेलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आदित्य ठाकरे 'मातोश्री' येथून आपल्या बीएमडब्ल्यू कारने खेरवाडी येथील सिग्नलला आल्यावर समोरून एका खासगी कारने सिग्नल तोडला आणि आदित्य ठाकरे यांच्या कारला धडक दिली. या अपघातामध्ये आदित्य यांची चूक नव्हती असे प्रत्यक्षदर्शी लोक आणि पोलिस सूत्रांनी सांगितले.

या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. आदित्य ठाकरे यांच्या बीएमडब्लू कारच्या बोनेटचे नुकसान झाले आहे. तसेच अपघातातील दुसऱ्या कारच्या दरवाजांचेही नुकसान झाले आहे. स्थानिक वाहतूक पोलिसांनी या अपघातप्रकरणी दुसऱ्या कार चालकाला दंड आकारला आहे.