मद्यधुंद पर्यटकांची उतरवली नशा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

खालापूर - मुंबई-पुणे महामार्गावरील बापदेव मंदिराच्या सभामंडपात कार घुसवलेल्या उरणच्या मद्यधुंद पर्यटकांची नशा विणेगाव ग्रामस्थांनी चोप देऊन उतरविली. त्यानंतर या अपघातातून देवानेच वाचविले, या भावनेतून हा सभामंडप बांधून देण्याची तयारी त्यांनी दाखवली.

येथे काल वर्षा सहलीची मजा लुटून झिंगाट अवस्थेत मोटारीतून जाणारे योगेश बबन मोरजे (वय 28, मूळ रा. बीड, सध्या उरण), सचिन गजानन पाटील (वय 33, पिरकोन, रा. उरण), राजेश हरिश्‍चंद्र भोईर (वय 38), महेंद्र रामचंद्र पेडणेकर (वय 40, दोघे रा. बेलदारपाडा, उरण), विष्णू गोपाळ पाबळे (वय 49), सनातन सुखदेवराव सुखेद (वय 44), गोरख भिकाजी आव्हा (वय 36) हे सर्व उरणला परतत होते. दुपारी साडेचारच्या सुमारास खालापूर हद्दीत विणेगावजवळ चालक गोरख आव्हाडचे मोटारीवरील नियंत्रण सुटून ती महामार्ग सोडून बापदेव मंदिरातील सभामंडपात घुसली.

त्या वेळी सभामंडपात बसलेले पुजारी काशिनाथ विठ्ठल गरुडे बचावले. कारमधील सर्व जण किरकोळ जखमी झाले. मंदिराचा सभामंडप आणि पुढील पुरातन मूर्तीचे नुकसान झाले आहे. हे कळताच विणेगाव ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असल्याने ग्रामस्थांनी चोप देत त्यांना चौक पोलिस ठाण्यात नेले.

Web Title: accident crime liquor