डहाणू-कोसबाड मार्गावर अपघात, एकाचा मृत्यु

अच्युत पाटील
गुरुवार, 5 एप्रिल 2018

बोर्डी - डहाणू कोसबाड मार्गावर वाकी येथे एसटी बस आणि दुचाकीची जोरदार टक्कर झाल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरूवार दिनांक 5 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. महादेव गोपाळ कोम (राहणार आगवन कोमपाडा तालुका डहाणू) असे मृत व्यक्तिचे नाव आहे. त्याच्या खिशात वाहन परवाना सापडल्याने त्यांची ओळख पटली आहे.

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, डहाणुहून बोर्डीकडे चाललेल्या यशवंती एसटीला समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार टक्कर मारली. महिन्याभरापूर्वी याच ठिकाणी पिक अप व्हॅन आणि दुचाकीचा अपघात झाला होता. यामध्ये दोन जणांचा मृत्यु झाला होता. घटनेची माहिती घोलवड पोलिसाना देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून जखमी महिलेस नजिकच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. 

Web Title: Accident on Dahanu-Kosbad Road, One Death