माळसेज घाटात भीषण अपघात; दोन ठार

Accident in malsej two killed
Accident in malsej two killed

सरळगांव - कल्याण- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळसेज घाटात प्रवाशी बस व अल्टो यांच्यात झालेल्या अपघातात 2 जण जागेवर ठार झाले आहेत. मृतांमध्ये 1 महिला व 1 पुरुषाचा समावेश आहे. वेगावर मर्यादा घाला अशी सुचना आगार प्रमुखांना देऊनही अपघात झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.    

कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक वाढल्याने अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. होणाऱ्या अपघातात एस टी महामंडळाच्या बस चे प्रमाण जास्त असल्याचे बोलले जाते. आरनाळा आगाराची प्रवासी बस माळशेच घाट मार्गे अळेफाटा कडे जात होती. तर अल्टो गाडी कल्याण कडे येत असताना प्रवाशी बसने आवळेची वाडी येथे या अल्टो गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत अल्टो गाडीचा चालक व एक महिला जागेवरच ठार झाली. तर त्याच्या समवेत असलेला लहान मुलगा जखमी झाला आहे. बस ने या अल्टो गाडीला दिलेली धडक ही एवढी भिषण होती की या अपघातात मृत झालेल्या चालकास गाडी कटरने कट करून काढावे लागले. अशी माहीती ए. पी. आय. धनंजय पोरे यांनी दिली. या घाटातून वेग वेगळ्या आगारातून प्रवाशी बसची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. हे बस चालक निर्दयपणे बस चालवत असल्याने अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. वारंवार एस टी महामंडळाच्या प्रवाशी बसचे अपघाती बसचे प्रमाण वाढले आहे. अल्टो या गाडीने शिवराम पांडूरंग नवले (वय - 65, रा. बनगेवाडी पारनेर, सुमनबाई शिवराम नवले व गणेश वाफारे हे  कल्याण कडे जात होते. या अपघातात शिवराम नवले व सुमनबाई हे दोघे जागेवरच ठार झाले. तर त्याच्याबरोबर असलेला मुलगा गणेश वाफारे हा जखमी झाला आहे. 

पत्र देऊनही दुर्लक्ष 
आतापर्यंत कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर  झालेल्या अपघातात आरणळा आगाराच्या बसचे प्रमाण जास्त आहे. वेळीच आपल्या आगारातील बस चालकांना वेगावर  नियंत्रण ठेवण्यास प्रबोधन करा असे लेखी पत्र देऊनही आगार प्रमुखांनी कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही. आतापर्यंतच्या झालेल्या अपघातात आरळणा आगाराच्या नंबर एक लागतो. - ए पी आय  धनंजय पोरे, टोकावडे पोलिस ठाणे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com