दारूच्या नशेत गाडी चालवताना अपघात

 Accident while running into drunken driving
Accident while running into drunken driving

मुरबाड ( ठाणे) - दारूच्या नशेत गाडी चालवत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सोमवारी ता. 23 माळशेज घाटात एक क्वालिस कार दरीत पडली या अपघातात मुंबईतील वर्सोव्याचे सात जण जखमी झाले आहेत.

दारूच्या नशेत गाडी चालवल्याने ही घटना घडल्याचे टोकावडे पोलिसांनी सांगितले आहे. माळशेज घाटातील बोगद्याच्या पुढे ही घटना घडली सुदैवाने कार खोल दरीत न गेल्याने सर्व जण बचावले या अपघातात सुनिल जाधव, संतोष रमेश कडु, सत्यजीत बांदेय, कुणाल बांदेय, बनवार देसाई, संतोष आर्यन, ड्रायव्हर सागर राजु बारया जखमी झाले कार चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी सांगितले आहे.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी माळशेज घाटात धबधब्यां जवळ दारू पिण्यास मनाई केली असून प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत तरी सुद्धा घाटात पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com