सॉफ्टवेअर तरुणीच्या हत्येतील आरोपीचा जामिनासाठी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

मुंबई - पुण्यातील हिंजवडी येथील सॉफ्टवेअर तरुणीच्या हत्याप्रकरणातील आरोपी भावेन सैकियाने पुणे सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. पुण्यात इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या रसिला हिची भावेनबरोबर शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशाराही तिने दिला होता. याचाच राग मनात ठेवून भावेनने तिची कार्यालयामध्ये गळा दाबून हत्या केली, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. मात्र अभियोग पक्षाने ठेवलेले आरोप चुकीचे असून, ज्याप्रकारे हत्या करणारी व्यक्ती फरारी होते, तसा भावेन फरारी झाला नाही, असा दावा वकील तौसीफ शेख यांनी अर्जात केला आहे. यावर लवकरच न्यायालयात सुनावणी होणार आहे.