नेरूळ रेल्वेस्थानकात दुकानदारांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

बेलापूर -  नेरूळ रेल्वेस्थानकाच्या बाहेर पश्‍चिमेला अपंगांसाठी दिलेल्या टेलिफोन बूथमधील आणि स्थानक कॉम्प्लेक्‍समधील दुकानांच्या मार्जिनल स्पेसमध्ये बेकायदा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर सिडकोने कारवाई केली. अपंगांच्या टेलिफोन बूथमध्ये बेकायदा कॅंटीन सुरू होते. तेथे गॅस सिलिंडरचा वापर केला जात होता. दाबेली, वडापाव, चायनीज, उसाच्या रसाचे गुऱ्हाळ आदींची तिथे विक्री केली जात होती. त्यामुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. शिवाय या परिसरात घाण आणि अस्वच्छता होती. या कॅंटीनमध्ये स्थानकाच्या सार्वजनिक शौचालयाचे पाणी वापरण्यात येत होते.

बेलापूर -  नेरूळ रेल्वेस्थानकाच्या बाहेर पश्‍चिमेला अपंगांसाठी दिलेल्या टेलिफोन बूथमधील आणि स्थानक कॉम्प्लेक्‍समधील दुकानांच्या मार्जिनल स्पेसमध्ये बेकायदा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर सिडकोने कारवाई केली. अपंगांच्या टेलिफोन बूथमध्ये बेकायदा कॅंटीन सुरू होते. तेथे गॅस सिलिंडरचा वापर केला जात होता. दाबेली, वडापाव, चायनीज, उसाच्या रसाचे गुऱ्हाळ आदींची तिथे विक्री केली जात होती. त्यामुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. शिवाय या परिसरात घाण आणि अस्वच्छता होती. या कॅंटीनमध्ये स्थानकाच्या सार्वजनिक शौचालयाचे पाणी वापरण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या बेकायदा व्यवसायांवर सिडकोने कारवाई केली.