तोतया अधिकाऱ्यांकडून अभिनेत्रीचे अपहरण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई - "सीबीआय' अधिकारी असल्याचे सांगून नवोदित अभिनेत्रीचे अपहरण करून लाखाची खंडणी मागणाऱ्याला विलेपार्ले पोलिसांनी नुकतीच अटक केली. आरोपींच्या तावडीतून पळाल्यानंतर पीडित अभिनेत्रीने आरडाओरडा केला. त्या वेळी पादचाऱ्यांनी एका आरोपीला पकडले. त्याचे तिघे साथीदार मात्र पळून गेले. 

अर्चना गौतम (वय 22) असे अभिनेत्रीचे नाव आहे. ती मॉडेल असून, गोरेगाव पश्‍चिम येथे राहते. नुकतीच तिची संशयित अनिरुद्धशी ओळख झाली होती. साडीच्या जाहिरातीत मित्राला मॉडेलची आवश्‍यकता आहे, असे त्याने अर्चनाला सांगितले. अर्चनाने त्याला दूरध्वनी केला. त्याने मंगळवारी (ता. 4) तिला जुहू चौक येथे बोलावले. संशयित तेथे कारने आले. अर्चना त्यांच्या गाडीत बसली असता, आम्ही सीबीआयचे अधिकारी आहोत, देहविक्रयच्या रॅकेटमध्ये तुझे नाव पुढे आल्याने तुला अटक करणार, अशी धमकी संशयितांनी तिला दिली. अटक टाळण्यासाठी संशयितांनी तिच्याकडे एक लाख रुपये मागितले. तिने होकार दिल्यानंतर आरोपींनी गाडी पुन्हा जुहू चौकात नेली. 

Web Title: actress kidnapping