आघाडीमध्ये ‘एमआयएम’ नकोच - काँग्रेस

Ambedkar-and-Owaisi
Ambedkar-and-Owaisi

मुंबई - असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’सोबत काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत आघाडी करूच शकत नाही, असे काँग्रेस नेत्यांनी आज भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांना स्पष्टपणे सांगितले. 

आज काँग्रेस नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आगामी आघाडीसाठी बैठक घेत चर्चा केली. प्रकाश आंबेडकर यांनी या आधीच ‘एमआयएम’सोबत युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर व ‘एमआयएम’ काँग्रेसच्या महाआघाडीचा घटक होण्याची शक्‍यता नसल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. पण काँग्रेससोबत चर्चेचे दरवाजे उघडे आहेत. काँग्रेससोबत आघाडी करण्यास हरकतच नाही, असे आंबेडकर यांनी आज पुन्हा स्पष्ट केले. 

‘एमआयएम’ हा कट्टर जातीयवादी व धार्मिक पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांच्याबरोबर आघाडी करूच शकत नाही, असे काँग्रेस नेत्यांनी आंबेडकर यांना स्पष्ट सांगितले.  काँग्रेसने आंबेडकर यांना स्वत:च्या कोट्यातून लोकसभा व विधानसभेच्या जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र ‘एमआयएम’सोबत जाणार यावर आंबेडकर ठाम असल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत सामील करून पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक होणार असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com