अजोय मेहता यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई - बेकायदा मंडप आणि फलकांवर कारवाई करण्यात कसूर केल्याच्या कारणावरून मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना मुंबई उच्च न्यायालयाने अवमानाची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यापुढे कारवाईत चालढकल न करण्याची ताकीद देऊन ही नोटीस शुक्रवारी (ता. 20) न्यायालयाने मागे घेतली. त्यामुळे पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिलासा मिळाला आहे.

बेकायदा मंडप आणि फलक लावणारे आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्यभरातील सर्व महापालिकांना दिले आहेत. मुंबई महापालिकेने या आदेशांचे योग्य पालन न केल्याचा ठपका ठेवून न्यायालयाने गतवर्षी पालिका आयुक्तांना अवमानाची नोटीस बजावली होती.

Web Title: ajoy mehta high court