संमेलनाच्या मंडपाचे पूजन उत्साहात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

कल्याण - डोंबिवलीत येत्या 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यातील कामांना सुरवात झाली आहे. रविवारी (ता. 22) संमेलन होणाऱ्या सावळाराम क्रीडा संकुलात मंडप पूजनाचा कार्यक्रम झाला. आठवडाभरात मंडपाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

कल्याण - डोंबिवलीत येत्या 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यातील कामांना सुरवात झाली आहे. रविवारी (ता. 22) संमेलन होणाऱ्या सावळाराम क्रीडा संकुलात मंडप पूजनाचा कार्यक्रम झाला. आठवडाभरात मंडपाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

संमेलन भव्य स्वरूपात करण्याची आयोजकांची इच्छा आहे; मात्र प्रत्यक्ष मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांनी हात आखडता घेणे पसंत केले आहे. नोटाबंदी, तसेच निवडणूक आचारसंहिता यामुळे निधी संकलनात अनेक अडचणी आल्या असतानाही नेटाने हाती घेतलेले कार्य सिद्धीस नेण्याची जिद्द बाळगून ते झटत आहेत. संमेलनापूर्वी होणाऱ्या कार्यक्रमांनाही आयोजकांनी कात्री लावली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर, तसेच काही महाविद्यालयांनी संमेलनपूर्व कार्यक्रम घेऊन वातावरणनिर्मितीस हातभार लावला. आयोजन संस्थेने अखेरच्या पंधरवड्यात संमेलनाच्या वातावरणास पोषक असे कार्यक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला होता; मात्र निधीच्या कमतरतेअभावी त्यास कात्री लावल्याचे दिसत आहे. 

ऑनलाइन प्रक्रियेद्वारे स्टॉलचे वाटप 
संमेलन काळात प्रकाशकांच्या लावण्यात येणाऱ्या स्टॉल्सचे वाटप करण्यात आले असून, ही प्रक्रिया ऑनलाइन झाली. शुक्रवारी सोडत पद्धतीने त्याचे वाटप झाले. सुरवातीला प्रकाशकांचा विरोध असतानाही प्रत्यक्षात त्यांनी याला प्रतिसाद दिला. सोडतीद्वारे 312 संस्थांना स्टॉल्स देण्यात आले. याव्यतिरिक्त अन्य काही स्टॉल्सही असतील, असे आयोजकांनी सांगितले. ग्रंथदिंडीनंतर हे प्रकाशकांचे दालन साहित्यप्रेमींना खुले करून दिले जाईल.

मुंबई

कल्याण : कल्याण पूर्व मधील सम्राट अशोक विद्यालय मधील विद्यार्थी वर्ग आणि शिक्षकांनी एकत्र येवून आज (सोमवार) सकाळी बैलपोळा साजरा...

05.24 PM

 डोंबिवली -  जिल्ह्यात धो-धो पाऊस पडत असून कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या 27गावांची पाण्याची तहान कायम...

05.12 PM

डोंबिवली - 8 दिवसांपूर्वी रबाळे  रेल्वे स्थानकात प्रवाशाने धक्का दिल्यामुळे तिकीट तपासणीस आर.जी.कदम  हे गंभीर जखमी झाले...

04.57 PM