ठाणेकर युवकाच्या अंतरिक्ष प्रकल्पाची ‘नासा’ने घेतली दखल   

ठाणेकर युवकाच्या अंतरिक्ष प्रकल्पाची ‘नासा’ने घेतली दखल   

ठाणे : शालेय शिक्षण घेत असताना ‘अंतराळ’ विषयावर पार पडलेल्या शास्त्रज्ञांच्या सेमिनारमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्याला संशोधनाचे वेड लागले अन त्याने बनवलेल्या अंतरीक्ष प्रकल्पाची थेट नासाने दखल घेतली आहे.

अक्षत मोहिते असे या ठाणेकर महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. त्याने बनवलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण 24 ते 27 मे रोजी अमेरिकेच्या लॉस एंजल्स होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विकास परिषदेतील पोस्टर सेशनमध्ये होणार आहे असे अक्षतने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन येथे राहणारा अक्षत सध्या मुलुंड येथील महाविद्यालयात अकरावी सायन्समध्ये शिकतो. वर्षभरापूर्वी घराजवळच पार पडलेल्या अंतराळ या विषयावरील सेमिनारमध्ये शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनंतर अक्षतला अंतराळ या विषयाचे जणू वेड लागले अन शिकता-शिकता त्याने आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या पर्यावरणीय घडामोडींमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी तसेच जगणे सुकर व्हावे यासाठी आगळावेगळ्या प्रकल्पाचा श्रीगणेशा करण्याचे ठरवले.

त्यानुसार चक्क अंतराळात जाऊन राहता येईल असे स्पेस (शहर) बनवण्याचा ध्यास त्याला लागला. त्याने दिपेश धायफुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सादर केलेल्या सॅक्झीमो (psaximo) या अंतरिक्ष प्रकल्पाची ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या नॅशनल स्पेस सोसायटीने दखल घेतली आहे. या प्रकल्पाच्या सादरीकरणानिमित्त अमेरिकेला प्रयाण करण्यासाठी अक्षतच्या पालकांनी पदरमोड करून तयारी चालवली आहे.

काय आहे प्रकल्प?
स्पेसरूपी शहरामध्ये रहिवाशी आणि औद्योगिक क्षेत्र असून यासाठी लागणारी वीज सौर उर्जा आणि मायक्रोव्हेवद्वारे निर्माण केली जाणार आहे. इंधनासाठी दोन इलेक्ट्रोन यांच्या संयोगातून इंधन निर्मिती केली जाणार आहे. हे स्पेस अंतराळात नेण्यासाठीही हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयुगावरील हायड्राजीन या इंधनाचा वापर केला जाणार आहे. तर,इंटरनेटसाठी वायफायऐवजी लाईट इंटरनेट म्हणजेच लायफाय हे तंत्र स्पेसमध्ये वापरले जाणार आहे.     

सध्या ग्लोबल वार्मिंग वाढले असून जागतिक स्तरावर सार्वत्रिक चिंता व्यक्त होत आहे, फ्रान्समध्ये दोन वर्षापूर्वी झालेल्या जागतिक तापमान विरोधी परिषदेत प्रदूषण रोखत तापमान वाढीला आळा घालण्याचे प्रयत्न होणे आवश्यक असल्याची बाब निदर्शनाला आणली होती. भारतासह अनेक देशांनी यासाठी झालेल्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर आपलाही हातभार असावा. यासाठीच हा मूलगामी उपाय सुचविणारा हा 35 पानांचा प्रकल्प आहे.
- अक्षत मोहिते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com