सर्वपक्षीय बैठकीनंतर मनसेची भूमिका काय? नांदगावकर म्हणाले...

मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेनं ३ मे पर्यंत अल्टिमेट दिला आहे.
Bala-Nandgaonkar
Bala-Nandgaonkar

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला मनसेच्यावतीनं बाळा नांदगावकर यांनी हजेरी लावली होती. बैठक संपल्यानंतर त्यांनी मनसेची भूमिका माध्यमांसमोर मांडली. (All Party Meet regarding loudspeaker row Bala Nandgaonkar told MNS role)

Bala-Nandgaonkar
मोदींच्या जम्मू दौऱ्यात घातपाताचा डाव; ड्रोनमधून फेकला बॉम्ब?

नांदगावकर म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीत आम्ही सहभागी झालो. मात्र, आम्ही अमच्या मतावर ठाम आहोत. याप्रकरणी मार्गदर्शक सूचना काय असाव्या हे सरकारनं ठरवलं पाहिजे. मनसेचा 3 मे रोजीचा अल्टिमेटम कायम आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही.

बैठकीत काय ठरलं?

सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, "सकाळी ६ ते रात्री १० भोंगे बंद करता येणार नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकासाठी कायदा समान असून सर्वांना एकच भूमिका घ्यावी लागणार आहे. कायदा भंग झाला तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे"

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, भोंग्यांसंदर्भातली विषयावर आम्ही केंद्राशी बोलू. इतर राज्यात काय परिस्थिती आहे ते ही तपासून घेऊ. आज बैठकीत जे जीआर निघाले त्याआधारे निर्णय घेत आहोत. पोलिसांशी बोलून नव्याने गाईडलाईन्स काढणार आहेत का? यावरही चर्चा केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com