आंबेडकर भवन पाडण्याशी संबंध नाही - गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

मुंबई - दादर येथील "आंबेडकर भवन' पाडण्याच्या कृतीत कोणत्याही प्रकारचा सहभाग नसून, या भवनाशी संबंधित "पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट'चा मी कायदेशीर पदाधिकारी अथवा सदस्य नाही. त्यामुळे ही वास्तू पाडून तिथे नवी इमारत बांधण्याशी माझा काहीही संबंध नाही, असा खुलासा राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी केला.

औरंगाबाद येथे गायकवाड यांना भारिप आणि बहुजन महासंघाच्या काही कार्यकर्त्यांनी नुकतीच मारहाण केली होती. दादर येथील "आंबेडकर भवन' पाडण्यास गायकवाड जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. गायकवाड यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आंबेडकर भवन पाडण्याशी माझा काहीही संबंध नाही. "पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट'चा कायदेशीर पदाधिकारी अथवा सदस्य नसतानाही जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी तसा प्रचार केला जात आहे, असा दावा गायकवाड यांनी केला. हा आपल्या प्रतिमेस धक्का पोचवण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.