पुस्तकांची रक्कमपुढच्या वर्षापासून बॅंक खात्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याच्या कसरतीपासून शिक्षण मंडळाने पळ काढला आहे. 

या योजनेला विरोध झाल्यानंतर ही योजना मागे घेत २०१८ या शैक्षणिक वर्षात ही योजना अमलात आणली जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. पुस्तकांची रक्कम थेट बॅंक खात्यात जमा झाल्यास अशिक्षित पालकांकडून या पैशांचा गैरवापर होण्याची भीती व्यक्‍त होत होती. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत साशंकता व्यक्त होत होती. मात्र, आता या योजनेची अंमलबजावणी पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. 