पाकीटमाराचा विद्यार्थ्यावर अंधेरी स्थानकात वस्तऱ्याने वार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मुंबई - लोकलमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यावर पाकीटमाराने वस्तऱ्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी अंधेरी स्थानकात घडली. यामध्ये सुनील आंबर्डेकर हा विद्यार्थी जखमी झाला आहे. पोलिसांनी तौसिफ गफूर सय्यद याला अंधेरी येथील गावदेवी डोंगर परिसरातून अटक केली आहे. त्याला गुरुवारी न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. चोरट्याने प्रवाशावर हल्ला केल्याची ही पहिलीच घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुनील हा गोरेगाव येथे राहतो. त्याने बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी गोरेगाव येथून लोकल पकडली. 7.15 वाजता लोकल अंधेरी स्थानकातील फलाट क्र. 5 येथे आली. तेव्हा लोकलमधील गर्दीचा फायदा घेऊन तौसिफने सुनीलच्या बॅगेतून त्याचे पाकीट चोरण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुनीलच्या लक्षात आला. त्याने आरडाओरड केल्यावर तौसिफ पळाला; मात्र त्याचा सुनीलने पाठलाग केला, तेव्हा तौसिफने खिशातून वस्तरा काढून सुनीलच्या पोटावर वार केला. प्रवाशांनी गस्तीवरच्या पोलिसांना याबाबत सांगितले. त्यानंतर जखमी सुनील याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या जबाबावरून अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सीसी टीव्हीतील चित्रीकरण तपासून तौसिफची ओळख पटवण्यात आली. बुधवारी रात्री अंधेरीच्या गावदेवी डोंगर परिसरातून त्याला ताब्यात घेतल्यावर चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. सुनील याची प्रकृती स्थिर आहे. त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Andheri station on a razor slash wallet student killed