अंजली दमानिया यांच्या नार्को टेस्टची मागणी

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

दमानिया यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी कल्पना इनामदार यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेत केली.

मुंबई - 'मी अण्णाच्या आंदोलनाचा एक भाग असल्यामुळे अंजली दमानिया माझी वारंवार माझी खोटी बदनामी करीत असून अण्णांच्या आंदोलनाचा अपमान करीत आहे. दमानिया यांची नार्को टेस्ट करा,' अशी मागणी कल्पना इनामदार यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेत केली.

त्या पुढे म्हणाल्या की, अंजली दमानिया यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. कल्पना इनामदार यांचीच नाही तर अंजली दमानिया आणि त्यांच्या घरी त्या बैठकीत असलेल्या सगळ्यांची नार्कोटेस्ट व्हावी. ललित टेकचंदानी आणि राजेश खत्री यांच्यामुळे एकनाथ खडसे अडकले. ललित टेकचंदानी आणि राजेश खत्री हे भाजप मंत्र्यांकडून सुपारी घेण्याचे काम करताहेत. ललित टेकचंदानी आणि राजेश खत्री हे भाजप साठी काम करताहेत.  खडसे यांना अडकविण्यासाठी मला अंजली दमानिया यांनी मला ऑफर दिली होती, असे कल्पना इनामदार म्हणाल्या.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Anjali Damaniyas Narco test demand