मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सफाई कामगारांची नियुक्ती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

भिवंडी - ठाणे महापालिका निवडणुकीत मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सफाई कामगारांची नियुक्ती केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सुमारे 70 कामगारांना आज प्रशिक्षणाची नोटीस आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आम्हाला निवडणुकीचे काम येत नाही, आमची नियुक्ती रद्द करा, अशी मागणी या कामगारांनी केली आहे. 

ठाण्यासाठी 21 फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी मागविणयात येते. ती आयुक्तांकडे देऊन संबधितांची नियुक्ती केली जाते. भिवंडी महापालिकेचे आस्थापना प्रमुख नितीन पाटील यांनी पालिकेतील स्मशानभूमी, साफसफाई बगीचा, शिपाई आदी चतुर्थ श्रेणीतील 70 कामगारांच्या नावांची यादी परस्पर ठाणे महापालिका आयुक्तांना पाठविली. या कामगारांना वर्ग 1 व 2 चे अधिकारी असल्याचे कळवण्यात आले. त्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जयस्वाल यांनी या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी या पदांवर नियुक्त केले. 

यादीनुसार निवडणूक प्रशिक्षणासाठी हजर राहण्याच्या लेखी सूचना आल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी ठाणे व भिवंडी पालिकेचे अधिकारी वर्गाकडे अर्ज केले आहेत; मात्र कोणी लक्ष देण्यास तयार नाही. या प्रकारामुळे निवडणूक कामात गोंधळ निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

चौकशी करतो - डॉ. म्हसे. 
भिवंडी पालिकेचे आस्थापण विभागाने केलेल्या कामाबाबत आपणास माहिती नाही. चौकशी करतो, अशी प्रतिक्रिया भिवंडी पालिकेचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. 

Web Title: Appointed as poll cleaning workers