"आरे'च्या कारशेडला शिवसेनेचे "का रे' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - गोरेगाव येथील आरे वसाहतीत मेट्रोच्या कारशेडसाठी विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या आरक्षणावरून शिवसेना व भाजप एकमेकांसमोर पहिल्याच महिन्यात उभे ठाकणार आहेत. विकास आराखड्याच्या नियोजन समितीने ही शिफारस कायम ठेवली असून आता आराखड्यावर महापालिकेच्या महासभेत चर्चा करताना खडाजंगी उडणार आहे. 

2014 ते 2034 या 20 वर्षांच्या प्रस्तावित विकास आराखड्यावर सोमवारी नियोजन समितीने आपला अहवाल महासभेला सादर केला. पालिका प्रशासनाने तयार केलेल्या अहवालात आरे वसाहतीत मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यासाठी कारशेडचे आरक्षण प्रस्तावित केले होते. शिवसेनेसह मनसेनेही या कारशेडविरोधात जोरदार आंदोलन केले आहे. नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव तसेच स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी या आरक्षणाला विरोध केला होता. त्यानंतरही समितीने हे आरक्षण कायम ठेवण्याची शिफारस केली आहे. तसा अहवाल सोमवारी महापौर स्नेहल आंबेकर यांना सादर करण्यात आला. 

शिफारशींसह प्रशासनाने तयार केलेल्या विकास आराखड्यावर महासभेत चर्चा झाल्यानंतर तो राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. आराखड्याला 20 मार्चपूर्वी अंतिम मंजुरी मिळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे 8 मार्चला नव्या महापौरांची नियुक्ती झाल्यानंतर तात्काळ या आराखड्यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे महापौर निवडीनंतरच्या पहिल्याच महासभेत शिवसेना व भाजप यांच्यात चांगलीच जुंपणार आहे. 

काय होणार आरेचे? 

- आरे वसाहतीचा परिसरावरील "ना विकास क्षेत्र' बदलून हरित क्षेत्र म्हणून घोषित करावे. 
- मेट्रो कारशेड, प्राणिसंग्रहालय व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विस्थापित आदिवासी पाड्यांच्या पुनर्वसनासाठी आरक्षण प्रस्तावित. 

Web Title: are colony issue