राखी सावंतविरुद्ध अटक वॉरंट; धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

'राखीने वाल्मिकी ऋषींच्या अनेक अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत,' असे तक्रारीत म्हटले आहे. 

मुंबई : आपले वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तनामुळे चर्चेत राहणारी बॉलिवूडमधील अभिनेत्री राखी सावंत हिच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. हिंदू धर्माचे महाकाव्य रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल तिला अटक करण्याचा आदेश येथील कनिष्ठ न्यायालयाने दिला आहे. 

एका खाजगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात मागील वर्षी तिने केलेल्या विधानांमुळे वाल्मिकी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल राखीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून 9 मार्च रोजी तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 
'राखीने वाल्मिकी ऋषींच्या अनेक अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत,' असे तक्रारीत म्हटले आहे. 

वारंवार समन्स बजावूनदेखील राखी 9 मार्च रोजी न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिली नाही. पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे. 
 

Web Title: arrest warrant against rakhi sawant